देशातील निर्यातीत मोठी वाढ, मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

देशातील निर्यातीत मोठी वाढ, मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची निर्यात ७६२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यापैकी ४५३ अब्ज डॉलर्स वस्तूंच्या निर्यातीतून आणि उर्वरित ३०९ अब्ज डॉलर सेवांच्या निर्यातीतून होत आहे, अशी माहीती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बेंगळुरू आणि हुबली येथे माध्यमांशी बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात मोबाइल फोनची निर्यात १५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या वळणावर पोहोचली असून मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन क्षेत्रावर मोठा भर दिला जात आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, उत्पादनाच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासामुळे १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होणा-या राष्ट्राचा पाया तयार झाला आहे. अशा वाढीमुळे युवकांसाठी औपचारिक रोजगार संधी वाढण्यास थेट हातभार लागत आहे. पूर्वी, मासिक रोजगाराच्या संधी सरासरी सहा लाख होत्या आणि आता त्या सरासरी १४-१५ लाखांपर्यंत वाढल्या आहेत, असेही ते म्हणाले.

तसेच पूर्वी निर्यातीवर पेट्रोलियमचे वर्चस्व असायचे मात्र आता भारत दूरसंचार उपकरणे, फार्मास्युटिकल्स, मोटार वाहने, इलेक्ट्रॉनिक घटक आणि इतर अनेक उत्पादनांच्या निर्यातीत अग्रेसर आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ११ अब्ज डॉलरच्या मोबाईल फोनची निर्यात केली आणि २०२३-२४ मध्ये ते १५  अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news