

अमरावती; पुढारी ऑनलाईन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात काल (रविवार) रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 40 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा ही आग लागली असून पोलिस-अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग किती भीषण होती, याचा अंदाज यावरून येताे की, आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 40 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.