Kulgam Encounter : जम्‍मू काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमकीत ५ दहशतवादी ठार | पुढारी

Kulgam Encounter : जम्‍मू काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमकीत ५ दहशतवादी ठार

श्रीनगर (जम्‍मू काश्मीर); पुढारी ऑनलाईन जम्‍मू काश्मीरच्या Kulgam Encounter कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. २ दहशतवादी लपून बसले हाेते. सुरक्षा दलांकडून त्‍यांचा तपास सुरू ठेवला हाेता. दरम्‍यान त्‍या दाेन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.  काल (गुरूवार) पासून सामनू गावात एन्काउंटर सुरू आहे.

गेल्‍या २ दिवसांत  ८ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. बारामुल्‍लात २ दहशतवाद्‍यांना ठार करण्यात आले, तर कुलगामात सुरू असलेल्‍या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले हाेते. कुलगाम मध्ये सुरू असलेल्या चकमकीत आणखी दोन दहशतवादी मारले गेले. आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. ऑपरेशन अंतिम टप्प्यात असून, क्षेत्र निर्जंतुक केले जात आहे.

#UPDATE | Kulgam Encounter update | Three Lashkar-e-Taiba terrorists killed in the ongoing encounter. Operation continues. https://t.co/OEYYLpMTr1

Back to top button