RS 1OOO Note : १ हजाराची नोट पुन्हा बाजारात येणार नाही ? | पुढारी

RS 1OOO Note : १ हजाराची नोट पुन्हा बाजारात येणार नाही ?

पुढारी ऑनलाईन डेस्क: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1000 रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणणार नाही, बँक लवकरच याबाबत माहिती देऊ शकते, असे वृत्त  एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.  चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद केल्यापासून गेल्या काही महिन्यांपासून आरबीआय आता 1000 रुपयांच्या नोटा बाजारात आणेल, अशी अटकळ बांधली जात होती.परंतु सध्या RBI कडून 1000 रुपयांची नोट चलनात न आणण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (RS 1OOO Note)

RS 1OOO Note : रुपयाच्या स्थिरतेवर आरबीआयचा भर

आज दिल्लीत, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी भारताची आर्थिक स्थिरता, कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयातील अस्थिरता याविषयी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आर्थिक चढउतारांदरम्यान रुपयाच्या स्थिरतेवर भर दिला.

डॉलर निर्देशांक बऱ्यापैकी मजबूत झाला आहे. अमेरिकेतील बाँडचे उत्पन्न सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे, परंतु या वर्षी १ जानेवारीपासून भारतीय रुपयाची अस्थिरता पाहिली तर रुपया ०.६ टक्क्यांनी घसरला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन डॉलर ०.६ ने घसरला आहे. याच कालावधीत 10 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे, असे दास यांनी सांगितले. चलनी नोटांच्या उपलब्धतेबाबत सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यमान मूल्यांच्या नोटा पुरेशा आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

 

हेही वाचा 

Back to top button