'रिअल लाईफ'मध्‍ये 'हम दिल दे चुके सनम'! मात्र 'क्लायमॅक्स'मध्‍ये बदल! | पुढारी

'रिअल लाईफ'मध्‍ये 'हम दिल दे चुके सनम'! मात्र 'क्लायमॅक्स'मध्‍ये बदल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलीवूडमध्‍ये ९०च्‍या दशकातील ब्लॉकबस्टर ‘हम दिल दे चुके सनम’ तुमच्‍या लक्षात असेल. या चित्रपट सुपरहिट होण्‍यामागे त्‍याची कथा खूपच महत्त्‍वपूर्ण ठरली होती. हे संगळं येथे सांगण्‍याची गरज म्‍हणजे या चित्रपटातील कथेप्रमाणेच काहीसे उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे घडलं आहे. मात्र अखेर रिअल लाईफमधील ‘हम दिल दे चुके सनम’च्‍या कथेत एक ट्विस्ट आहे. (Filmy Love Story) जाणून घेवूया सध्‍या उत्तर प्रदेशमध्‍ये चर्चेचा विषय ठरलेल्‍या एका प्रेम प्रकरणाविषयी…

प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी पाेहचला तिच्या सासरी

देवरिया येथील जोडप्याचे लग्न होऊन एक वर्ष झाले होते; पण पत्नीचे बिहारमधील एका तरुणाशी लग्‍नापूर्वी प्रेमसंबंध हाेते. शुक्रवार २२ सप्‍टेंबर राेजी पत्‍नीचा प्रियकर आकाश हा तिला भेटण्यासाठी देवरिया येथील सासरच्या घरी पोहोचला. त्‍याला सासरच्या मंडळींनी घरातच पकडले. तेव्हा पतीसमाेर हा संपूर्ण प्रकार उघड झाला.  ग्रामस्‍थांनी आकाशला पकडून बेदम मारहाण केली. (Filmy Love Story)

बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी असलेल्या आकाश शाहने सांगितले की, त्याचे महिलेसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तिचे दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाले. मात्र तो तिला अद्यापही विसरू शकला नाही. त्यानंतर त्याने तिला भेटायचे ठरवले आणि थेट तिचे सासरचे घर गाठले.

वास्‍तवातील ‘हम दिल दे चुके सनम’मध्‍ये ट्विस्ट

‘हम दिल दे चुके सनम’  चित्रपटातील प्रियकर समीर ( सलमान खान) याचे नंदिनी (ऐश्वर्या रॉय) हे एकमेकांच्‍या प्रेमात पडतात; पण नंदिनीi; वडील ( विक्रम गोखले) यांना हे नाते मान्य नसते. ते तिचे लग्न वनराज (अजय देवगन) याच्‍याशी लावून देतात.अखेर नंदिनीला विदेशात राहणार्‍या प्रियकर समीरशी भेट घडवून आणण्‍यासाठी पती वनराज पुढाकार घेताे. मात्र अखेर चित्रपटाच्‍या ‘क्लायमॅक्स’मध्‍ये नंदिनीचे मतपरिवर्तन हाेते आणि ती पती वनराज यांच्‍याबराेबरच राहण्‍याचा निर्णय घेते.

उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे ‘हम दिल दे चुके सनम’  चित्रपटासारखेच घडलं. मात्र याच्‍या ‘क्लायमॅक्स’मध्‍ये बदल झाला. पत्नीने पतीला तिच्या प्रियकरासह जाऊ देण्याची विनंती केली. यामुळे मतपरिवर्तन झालेल्‍या पतीने आपल्‍या पत्‍नीचे लग्‍न तिचा प्रियकर आकाशबराेबर लावून देण्‍यात पुढाकार घेतला. दोन्ही कुटुंबांची संमती घेतल्यानंतर पतीने स्‍वत: पत्नी आणि तिच्या प्रियकराi; मंदिरात लग्न लावून दिले. पतीने दाखवलेल्‍या समजसपणाची चर्चा सध्‍या उत्तर प्रदेशमध्‍ये चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा

Back to top button