Kakrapar Nuclear Power Plant : गुजरातच्या काक्रापार येथे भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी कार्यान्वित | पुढारी

Kakrapar Nuclear Power Plant : गुजरातच्या काक्रापार येथे भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी कार्यान्वित

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kakrapar Nuclear Power Plant : गुजरातच्या काक्रापार येथे भारतातील पहिली स्वदेशी विकसित अणूभट्टी कार्यान्वित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे. हा अणुऊर्जा प्रकल्प 700 मेगावॉट क्षमतेचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत याविषयी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. गुजरातमधील सर्वात मोठ्या स्वदेशी निर्मित 700 मेगावॅट काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प युनिट-3 पूर्ण क्षमतेने कार्य करू लागला. आमच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन.

Kakrapar Nuclear Power Plant : देशभरात 16 अणू भट्ट्या विकसित करण्याची योजना

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) काक्रापार येथे प्रत्येकी 700 MW क्षमतेचे दोन प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स (PHWR) बांधत आहे. तसेच प्रत्येकी 220 मेगावॅट क्षमतेचे दोन वीज प्रकल्प आहेत. NPCIL ने देशभरात सोळा 700 MW PHWR बांधण्याची योजना आखली आहे. यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली आहे.

गुजरातनंतर सध्या राजस्थानमधील रावतभाटा (RAPS 7 आणि 8) आणि हरियाणातील गोरखपूर (GHAVP 1 आणि 2) येथे 700 मेगावॅटचे अणुऊर्जा प्रकल्प निर्माणाधीन आहेत. तर सरकारने इतर चार ठिकाणी फ्लीट मोडमध्ये 10 स्वदेशी विकसित PHWRs बांधण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये हरियाणातील गोरखपूर, मध्य प्रदेशातील चुटका, राजस्थानमधील माही बांसवारा आणि कर्नाटकातील कैगा या ठिकाणांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

Back to top button