PM मोदी बंगळुरात पोहोचले; जय विज्ञान-जय अनुसंधानचा नारा; इस्रोच्या वैज्ञानिकांना लवकरच भेटणार | पुढारी

PM मोदी बंगळुरात पोहोचले; जय विज्ञान-जय अनुसंधानचा नारा; इस्रोच्या वैज्ञानिकांना लवकरच भेटणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेतून ग्रीस येथून भारतात थेट बंगळुरात पोहोचले. विमानतळाबाहेर मोदींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, जय विज्ञान जय अनुसंधानच्या नाऱ्यांनी परिसर पूर्ण दणाणून सोडला आहे. लवकरच ते इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” चांद्रयान 3 लँडिंगच्या वेळी मी देशात नसल्यामुळे मी स्वत:ला रोखू शकलो नाही, परंतु मी भारताला भेट दिल्यानंतर प्रथम बेंगळुरूला भेट देण्याचा निर्णय घेतला.”

Back to top button