सॅटलाईटद्वारे घेतलेल्या फोटोंमधून चीनचा दुटप्पीपण उघड; सीमेवरील बांधकामाची दृष्ये आली समोर | पुढारी

सॅटलाईटद्वारे घेतलेल्या फोटोंमधून चीनचा दुटप्पीपण उघड; सीमेवरील बांधकामाची दृष्ये आली समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि चीनच्या सर्वोच्च नेत्यांमधील पार पडलेली बैठक चीन परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या दाव्यामुळे झाकली गेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील बैठकीची सुरुवात नवी दिल्लीतून झाली, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले आहे. चीनच्या या दाव्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील (MEA) सूत्रांनी खंडन केले आहे. चीनकडून द्विपक्षीय चर्चेसाठी प्रलंबित विनंतीनंतर अनौपचारिक बैठक झाली, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तथापि, ही घटना चीनकडून संशयास्पद हालचालींचे हे पहिलेच उदाहरण नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात “सीमेवरील प्रदेशात शांतता” राखण्याच्या महत्त्वावर भर दिला होता. मात्र, इंडिया टुडेने यातील दृष्य पुराव्यांची पुन्हा एकदा तपासणी केली. यातून चीनच्या पश्चिमेकडील भूमिकेबाबत असलेला दुटप्पीपणा उघड झाला आहे. इंडिया टुडेने उपग्रहाद्वारे काही फोटो मिळवले आहेत. यातून अक्साई चीनच्या प्रदेशात लष्कराकडून सुरु असलेल्या बांधकामाची दृष्ये दिसत आहेत.

अमेरिकेतील एका अंतराळ कंपनीने या संदर्भात फोटो मिळवले आहेत. या फोटोंमधून चीनकडून सुरु असलेले रस्त्यांचे बांधकाम, २५० हेक्टरमध्ये वेगाने विस्तारत असलेल्या लष्करी सुविधा दिसत आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) अंदाजे ६५ किमी अंतरावर असलेली ही बांधकामे गेल्या काही महिन्यांत पूर्ण झाली आहेत. ज्या काळात दोन्ही राष्ट्रे सीमा वाटाघाटींमध्ये गुंतलेली होती. रस्ते, साठवण सुविधा, प्रशासकीय इमारती यासारखी असंख्य बांधकामे पूर्णत्वास आल्याचे दिसत आहे. मे २०२० मध्ये सुरू झालेल्या सीमेवरील तणावानंतर या प्रदेशातील वातावरण आणि कडाक्याच्या थंडीच्या परिस्थितीशी जुळवून घेताना PLA (पीपल्स लिबरेशन आर्मी) च्या सैनिकांसमोरील आव्हाने दर्शविणार्‍या अहवालांच्या पार्श्वभूमीवर या संरचनांचा उदय झाला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button