Chandrayaan-3 : ‘या क्षणांनी जीवन धन्य झाले..’ चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

Chandrayaan-3 : 'या क्षणांनी जीवन धन्य झाले..' चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताचे ‘चांद्रयान’ ३ आज (दि. २३) सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सहा वाजून चार मिनिटांनी पाेहचले. या यशाने संपूर्ण देशात एकच जल्‍लाेष झाला. चांद्रयान-३ माेहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्‍हणाले, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे भारताचे पहिले यानआहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश (Chandrayaan 3 Landing Live) ठरला आहे. चांद्रयान-३ ही मोहिम जरी भारताची असली तरी साऱ्या जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले होते. प्रत्येक भारतातील नागरिक या मोहिमेसाठी उत्सुक होता. आता या यशस्वी मोहिमेनंतर प्रत्येक नागरिकाचा आनंद द्विगुणित झालेला आहे.

इतिहास घडताना पाहिला, माझं जीवन धन्य झालं : पंतप्रधान माेदी

पंतप्रधान माेदी यांनी यावेळी सर्व सहभागी शास्त्रज्ञांसह सर्वांचे अभिनंदन केले. इतिहास घडताना पाहिला.  या क्षणांनी माझं जीवन धन्य झालं आहे. हे यश आणि हे क्षण अविश्विसनीय आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.  चंद्रयान-३ यशस्वी झाले आहे. आम्ही भविष्याकरिता काही महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेतलेले आहेत. भारत आता चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर हे वेळेवेळी दाखवून देत आहे की, आपला देश तंत्रज्ञानामध्ये अधिका-अधिक प्रगती करत आहे, असेही पंतप्रधान माेदी म्‍हणाले.

हेही वाचा

Back to top button