हिंसाचारग्रस्त मणिपुरात २५ वर्षांनंतर हिंदी चित्रपट!

Manipur - Hindi Movie
Manipur - Hindi Movie
Published on
Updated on

इम्फाळ : वृत्तसंस्था  : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त हमार स्टुडंटस् असोसिएशन या आदिवासी संघटनेने 'रेप्लिका गन्स' आणि 'उरी' या हिंदी चित्रपटांचे आयोजन केले होते. गेली 20 वर्षे मणिपुरात हिंदी चित्रपटांवर बंदी होती. हमार स्टुडंटस् असोसिएशनने याबाबत जारी केलेल्या निवेदनात, या उपक्रमाचे आयोजन म्हणजे मणिपूरच्या दहशतवादी संघटनांच्या विरोधात आम्ही वाजविलेला एक राष्ट्रवादी बिगुल आहे, असे म्हटलेले आहे. मणिपूरच्या जनतेलाही या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करतो, असेही संघटनेने म्हटले आहे.

2000 (12 सप्टेंबर) पासून येथे हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन झालेले नाही. रिव्होल्युशनरी पिपल्स फ्रंटसह काही बंडखोर गटांनी हिंदी चित्रपटांवर बंदी घातली आहे. 'कुछ कुछ होता है' हा हिंदी चित्रपट 1998 मध्ये मणिपूरमध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता. मणिपूरची चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिच्यावर बेतलेला चित्रपटही या बंदीमुळे तिच्या मूळ राज्यात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. मार्चमध्ये उखरुल येथे अपवाद म्हणून शाहरूख खानच्या 'पठाण'चे काही खेळ प्रचंड पोलिस बंदोबस्तात झाले होते. चुराचंदपूर येथे स्वातंत्र्यदिनी कुकी बंडखोरांनी सशस्त्र परेड काढली.

निवृत्त जनरल निशिकांत सिंह यांनी त्यावर ट्विट केले असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त सशस्त्र परेड केवळ सुरक्षा दले करतात, हेच आजवर पाहिले आहे; पण दहशतवादीही शस्त्रे घेऊन यानिमित्त परेड करताना पहिल्यांदा पाहिले, असे त्यात सिंह यांनी म्हटले आहे. मैतेई जनतेने सरकारवर विश्वास ठेवताना आत्मसंरक्षणार्थ तत्पर राहावे, असे आवाहनही सिंह यांनी या ट्विटमधून केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news