PM E-Bus scheme : पीएम ई-बस योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी | पुढारी

PM E-Bus scheme : पीएम ई-बस योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : PM E-Bus scheme : केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पीएम ई-बस सेवा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १६) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंजुरीची घोषणा केली.

मंत्री ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील १०० शहरांमध्ये ई-बस चालवण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ५७,६१३ कोटी रुपये या योजनेसाठी खर्च होणार आहेत. यापैकी २०,००० कोटी रुपये केंद्र सरकारमार्फत देण्याची तरतुद  करण्यात आली आहे तर उर्वरित रक्कम राज्य सरकारमार्फत खर्च करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या योजनेअंगतर्ग संपूर्ण देशभरात सुमारे १०,००० नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (PM E-Bus scheme)

हरित गतिशीलता आणि हवामान बदलांच्या तयारीवर लक्ष ठेवून, १०० शहरांमध्ये १०,००० नवीन इलेक्ट्रिक बसेस आणल्या जातील, असे ठाकूर म्हणाले. आव्हान पद्धतीद्वारे शहरांची निवड केली जाईल असेही मंत्री ठाकूर यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button