Jadavpur University Raging Case : रॅगिंगचा बळी ठरलेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी आणखी दोघांना अटक

W. Bengal Raging Death
W. Bengal Raging Death

पुढारी ऑनलाइन डेस्क : Jadavpur University Raging Case : पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठात रॅगिंगचा बळी ठरलेल्या प्रथम वर्षीय विद्यार्थी स्वप्नदीप कुंडूच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. तसेच रॅगिंगचा मुख्य सूत्रधार असलेल्या सौरव चौधरीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅगिंग वेळी हे दोघेही तिथे उपस्थित होते. सौरवच्या सांगण्यावरून या दोघांनी मयत स्वप्नदीपचा मानसिक छळ करून रॅगिंग केली. दीपशेखर दत्ता (19) आणि मनोतोष घोष (20) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Jadavpur University Raging Case : आरोपींकडून स्वप्नदीपचा मानसिक-शारीरिक छळ

मयत विद्यार्थी स्वप्नदीप याला सुरुवातीला मुख्य वसतिगृहात खोली मिळाली नाही. त्यामुळे त्याने आरोपी मनतोष घोष याच्या खोलीत पाहुणा विद्यार्थी म्हणून राहत होता. मनतोष घोष हा समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे. तर दीपशेखर हा अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी आहे. तर मुख्य आरोपी सौरभ चौधरी हा माजी विद्यार्थी आहे. सौरभच्या सांगण्यावरून दीपशेखर आणि मनतोष दोघांनी मयत स्वप्नदीपचा छळ केला. त्याला सातत्याने त्याचा परियच करून द्यायला सांगत असे. तसेच त्याला नग्न करून गे म्हणून चिडवत असे. आरोपींनी त्याला एका विशिष्ट आकारात खूर्ची कापायला सांगितली होती.

परिणामी या छळाला कंटाळून स्वप्नदीपने वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत प्रचंड जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने उडी मारली तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते तो विवस्त्र होता. अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Jadavpur University Raging Case : 'मी समलिंगी नाही'

स्वप्नदीप हा मृत्यूपूर्वी वारंवार मी समलिंगी नाही असे म्हणत होता. तसेच या संपूर्ण घटनेचा साक्षीदार असलेल्या विद्यार्थ्याने स्पप्नदीपला बालकनीतून उडी मारताना रोखण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्याचा हात पकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो त्याला वाचवू शकला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news