Sharad Pawar : काहीही झालं तरी तडजोड नाही; भाजप विरोधातच लढायचं; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश | पुढारी

Sharad Pawar : काहीही झालं तरी तडजोड नाही; भाजप विरोधातच लढायचं; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट, पुढारी वृत्तसेवा; Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याबाबत केंद्राकडून दबाव आहे, असा खळबळजनक दावा करीत शरद पवार यांनी काही झालं तरी तडजोड करणार नाही, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर वर सोमवारी मणिपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांसोबत बोलतांना त्यांनी हे भाष्य केल्याचे कळतेय. कुठलाही दबाव असला तरी, काहीही झाल तरी आपण पुन्हा सगळ उभं करू. काहीही झालं तरी आपण तडजोड करणार नाही. आपल्याला भाजप विरोधातच लढायचं आहे, अशी भूमिका पवारांनी (Sharad Pawar) कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली.
मनात कुठेही शंका आणू नका, मी भाजपसोबत जाणार नाही, आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा’, अशा सूचना शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना दिल्याचे कळतेय.मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. यानंतर पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते.
हे ही वाचा :

Back to top button