हिमाचलमध्ये पावसाचा कहर : आतापर्यंत तब्बल १९९ लोकांचा मृत्यू; ३१ जण बेपत्ता

पुढारी ऑनलाईन ; हिमाचल प्रदेशात मान्सून सुरू झाल्यापासून सुमारे 200 लोकांचा पावसामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 31 लोक बेपत्ता झाले आहेत, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.
पावसाळ्यात आतापर्यंत विविध कारणांमुळे १९० जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे 57 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्ते अपघात किंवा अन्य कारणांमुळे 142 जणांना जीव गमवावा लागला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 31 लोक बेपत्ता आहेत आणि 229 लोक जखमी झाले आहेत असे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव म्हणाले की, राज्यात पाऊस आणि पुरामुळे जीवितहानी दररोज वाढत आहे. पावसामुळे पायाभूत सुविधांच्या होणार्या नुकसानीतही दररोज वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Himachal monsoon mayhem: 199 people dead, 31 missing till now
Read @ANI Story | https://t.co/wAkBzDq1S2#himachalpradeshflood #monsoon pic.twitter.com/qCgfxgaouk
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2023