vatican city : पीएम मोदी यांनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट | पुढारी

vatican city : पीएम मोदी यांनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट

व्हॅटिकन सिटी; पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी व्हॅटिकन सिटीमध्ये (vatican city) पोहोचले. जिथे त्यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदीही व्हॅटिकनला रवाना झाले. या बैठकीदरम्यान त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर होते. पंतप्रधान मोदी पाच दिवसांच्या इटली आणि ब्रिटन दौऱ्यावर शुक्रवारी रोमला पोहोचले आहेत.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींचे व्हॅटिकन (vatican city) येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. लिओनार्डो सेपियान्झा यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आणि व्हॅटिकनमधील इतरांशी त्यांची ओळख करून दिली. मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्यासोबत काही वेळ घालवला आणि विविध विषयांवर चर्चा केली. काही वेळाने पंतप्रधान मोदी व्हॅटिकनहून निघून गेले.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले होते की, पीएम मोदी २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत रोम आणि ग्लासगो दौऱ्यावर असतील. पीएम मोदी २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान जी-२० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रोम (इटली) येथे असतील, त्यानंतर २६ व्या पक्षांच्या परिषदेत (COP-26) जागतिक नेत्यांसोबत शिखर परिषदेसाठी ते ग्लासगोला रवाना होतील.

यासोबतच इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा करण्यासोबतच ते इतर अनेक द्विपक्षीय बैठकांनाही उपस्थित राहणार असल्याचे श्रृंगला यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button