

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने एनसीसीएफ व नाफेडला टोमॅटोची विक्री 50 रुपये किलो दराने करण्याचे निर्देश जारी केले आहेत. केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने हे निर्देश जारी केले. गत काही दिवसांत घाऊक बाजारात टोमॅटो दरात काहीशी घसरण झाली आहे, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
14 जुलैपासून दिल्ली व एनसीआरमध्ये टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू झाली आहे. 13 ऑगस्टपर्यंत नाफेड व एनसीसीएफने किरकोळ बाजारात 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी व विक्री केली. एनसीसीएफ व नाफेडने सुरुवातीला टोमॅटो 90 रुपये प्रतिकिलो दराने विकले, नंतर 80 व नंतर 70 रुपयांपर्यंत दर कमी करण्यात आले. आता स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटो 50 रुपये किलोने विकला जाणार आहे.