आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणीची अट रद्द | Covid 19 Guidelines | पुढारी

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आरटी-पीसीआर चाचणीची अट रद्द | Covid 19 Guidelines

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी घालण्यात आलेली आरटी-पीसीआर चाचणीची अट केंद्र सरकारने रद्द केली आहे (Covid Guidelines). कोरोनाचे संकट बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने विविध देशांनी लसीकरणाचा कार्यक्रम राबविला होता. हा कार्यक्रम जवळपास पूर्ण झाला आहे तर दुसरीकडे कोरोनाची लाट कोणत्याही देशात राहिलेली नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी घालण्यात आलेल्या अटीत शिथिलता आणली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याबाबतची नवी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी 20 जुलै रोजीच्या मध्यरात्रीपासून सुरु होईल.

हेही वाचा

Back to top button