central vista project संदर्भातील याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी | पुढारी

central vista project संदर्भातील याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

दिल्‍लीतील मध्यवर्ती भागात केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासंदर्भातील (central vista project) याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी घेतली जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी सांगण्यात आले.

सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत (central vista project) नवीन संसद भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान आणि महत्वाच्या सरकारी कार्यालयांची उभारणी सुरु आहे. प्रकल्पातील एका प्लॉटचा मनोरंजन पार्कऐवजी निवासस्थाने उभारण्यासाठी वापर केला जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्याला आक्षेप राजीव सुरी नावाच्या व्यक्‍तीने याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण आता पुढील महिन्यात सुनावणीसाठी येईल.

अन्य कारणांसाठी जागा वापरण्याचा निर्णय घेताना जनहित लक्षात घेण्यात आले नाही, असे सुरी यांनी याचिकेत म्हटले आहे. याचिकेची दखल घेऊन योग्य ते उत्‍तर सादर करण्यात आले असल्याचे यावर केंद्राकडून न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाला सांगण्यात आले. सरकारच्या उत्‍तरावर म्हणणे मांडण्याचे निर्देश आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने सुरी यांना दिले.

हे ही वाचलं का?

Back to top button