दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून समर्थन मागितले होते. त्यावर ठोस भूमिका घेण्यास काँग्रेसने टाळाटाळ चालविली होती. तर पाटणा येथील विरोधी आघाडीच्या बैठकीदरम्यान आप नेत्यांनी यावरून काँग्रेसला सुनावले होते. मात्र आता काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी संसदेत या अध्यादेशाला विरोध केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून समर्थन मिळाल्यामुळे विरोधी आघाडीच्या बंगळुरूमध्ये 17-18 तारखेला होणाऱ्या बैठकीस आप हजर राहणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.