Adani-Hindenburg : अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी सेबीचे सर्वोच्च न्यायालयात 41 पानांचे प्रतिज्ञापत्र

Adani-Hindenburg : अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी सेबीचे सर्वोच्च न्यायालयात 41 पानांचे प्रतिज्ञापत्र

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 10, Adani-Hindenburg : बहुचर्चित अदानी-हिंडनबर्ग प्रकरणी भांडवली बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या सेबी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात 41 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल करीत योग्य ते आदेश देण्याची विनंती केली आहे. सदर प्रकरणावर न्यायालय मंगळवारी सुनावणी घेणार आहे.

अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था हिंडनबर्गने अदानी उद्योग समूहाच्या कामकाजात हेराफेरी असल्याचा सनसनाटी आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. प्रकरणाच्या एकूण चौकशीसाठी न्यायालयाने विशेष समितीची स्थापना केली होती. समितीने आपला अहवाल याआधीच न्यायालयाकडे सोपविलेला आहे.

Adani-Hindenburg :14 ऑगस्टपर्यंत दिली होती मुदत

हिंडनबर्गने अदानी समुहावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. त्यानुसार गेल्या मे महिन्यात न्यायालयाने सेबीला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. सेबीने चैकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची वेळ मागितली होती, तथापि तीन महिन्यात म्हणजे 14 आॅगस्टपर्यंत तपास पूर्ण करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर सेबीने सर्वोच्च न्यायालयात 41 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news