नवी दिल्ली, १९ जून, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने अयोग्य ठरवलेल्या १७ खाजगी हज ऑपरेटरांना सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायालयाने या ऑपरेटरांना १२०० यात्रेकरुंना हजवर घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. जोपर्यंत हजला जाणारे भाविक परत येत नाहीत. तोपर्यंत या हज ऑपरेटरांवर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. ७ जुलैला यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने आपली बाजू मांडावी, असे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.