फाळणीसाठी जबाबदार पक्ष धर्मनिरपेक्ष कसा? | पुढारी

फाळणीसाठी जबाबदार पक्ष धर्मनिरपेक्ष कसा?

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुस्लिम लीग संदर्भात अमेरिकेत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.काँग्रेस-भाजपमध्ये या निमित्ताने पुन्हा वाक्युद्ध रंगल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष आहे, या राहुल गांधींच्या वक्तव्यावर पलटवार करतांना भाजपने आगपाखड केली आहे. राहुल यांना काही एक महिती नसते. कुठलाही विचार न करता ते वक्तव्य करतात, असा टोला भाजपने लगावला आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. मोहम्मद अली जिना यांची मुस्लिम लीग धार्मिक आधारावर भारताच्या फाळणीसाठी जबाबदार होती. अशात हा पक्ष धर्मनिरपेक्ष कसा असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल यांचे वक्तव्य अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून देशातील काही लोक मुस्लिम लीगचे समर्थन करणार्‍या व्यक्तीला धर्मनिरपेक्ष मानतात, असा टोला ही त्यांनी लगावला. राहुल यांनी इतिहासाचा अभ्यास करूनच बोलले पाहिजे. काँग्रेस अगोदर मुस्लिम लीगचा संबंध भाजपसोबत जोडत होती. आता राहुल गांधी काही दुसराच राग आवळत आहेत, अशी टीका भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी केली.

नाईलाईज म्हणून ते बोलले

धर्माच्या आधारावर भारताच्या विभाजनला जबाबादार असलेल्या जिनांची मुस्लिम लीगला राहुल गांधी धर्मनिरपेक्षफ म्हणत आहेत.राहुल जरी कमी शिक्षित असले तरी या वक्तव्यातून ते कपटी असल्याचे दिसून येते. वायनाडमध्ये स्वीकार्यता कायम ठेवण्यासाठी नाईलाजास्तव राहुल गांधी मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणत आहे, असा दावा भाजप नेते अमित मालवीय यांनी केला.

Back to top button