Love Jihad : भाजप नेत्याच्या मुलीचा मुस्लीम युवकाशी होणारा विवाह लांबणीवर! हिंदुत्ववादी संघटनांनी केला विरोध

Love Jihad Yashpal Benam
Love Jihad Yashpal Benam
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : द केरळ स्टोरी चित्रपटामुळे लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अशातच उत्तराखंडमध्ये एका भाजप नेत्याच्या मुलीचा विवाह एका मुस्लिम युवकाशी होणार होता. त्याची लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हारयल झाली. त्यावरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. तसेच काही संघटनांनी केलेल्या विरोधामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असत. त्यामुळे अखेर त्याने हे लग्न पुढे ढकलले आहे. 'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने 'स्क्रोल डॉट इन'ने याचे वृत्त दिले आहे.

दिलेल्या महितीनुसार, उत्तराखंडमधील यशपाल बेनम हे भाजप नेते असून ते पौरी नगर पालिकेचे अध्यक्ष आहेत. त्यांची मुलगी मोनिका हिचा विवाह मोनिस नावाच्या व्यक्तीसोबत 28 मे रोजी होणार होता. मात्र, लग्नपत्रिकेचे छायाचित्र आमंत्रणासाठी सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर बेनम यांना मोठ्या टीका सहन करावी लागली. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ट्रोल करण्यात आले. अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी या लग्नाला विरोध केला. तसेच हे लव्ह जिहादचे षडयंत्र असल्याचे म्हटले.

….अखेर लग्न पुढे ढकलले

मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यानंतर अखेर बेनम यांनी 28 तारखेला हा विवाह होणार नाही, असे म्हटले आहे. याबाबत बेनम यांनी निवारी सांगितले की, लग्नामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागू नये अशी माझी इच्छा आहे.

ते म्हणाले, "या लग्नावरून माझ्याच पक्षातील काही लोकांनी वराच्या पालकांशी निर्माण केलेल्या वादावर मी चर्चा केली आहे आणि आम्ही मिळून सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे," असे यशपाल यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्याने सांगितले की, काही स्थानिक संघटनांनी या लग्नाला विरोध करण्याची योजना आखली होती. "पोलिस सतर्क आहेत पण बळाच्या सावलीत लग्न पार पाडणे चांगले वाटत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन, दोन्ही कुटुंबांनी 26, 27 आणि 28 मे रोजी होणार्‍या कार्यक्रमांना पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे. काय करायचे ते आम्ही लवकरच ठरवू."

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news