माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे यांच्याकडून श्रद्धांजली | पुढारी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनिया गांधी, मल्लिकार्जून खरगे यांच्याकडून श्रद्धांजली

पुढारी ऑनलाइन डेस्क : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आज रविवारी राष्ट्रीय राजधानीतील वीर भूमी येथे त्यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

दिवंगत राजीव गांधी यांनी 1984 मध्ये त्यांची आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा वयाच्या 40 व्या वर्षी ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. त्यांनी 2 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले.

20 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक रॅलीदरम्यान लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली.

हे ही वाचा :

Priyank Kharge : काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना मंत्रिपद

Karnataka News | कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळात १० ते १२ मंत्री?, संभाव्य यादी आली समोर

Back to top button