Adani-Hindenburg case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी सेबीला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ | पुढारी

Adani-Hindenburg case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी सेबीला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा नवी दिल्ली, दि. 17, Adani-Hindenburg case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. अदानी समूहाने आपल्या कंपन्यांच्या समभागांचे भाव कृत्रिमरित्या वाढविल्याचे तसेच त्यांच्या नियामक माहितीमध्ये त्रुटी असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे.
अदानी प्रकरणाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने अलीकडेच आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला दिला होता. अहवालाच्या प्रती सर्व संबंधितांना दिल्या जाव्यात, असे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिले. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जावी, अशी विनंती सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. आम्ही सुरुवातीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यास इच्छुक होतो, पण आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे, असेही खंडपीठाकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा :

Back to top button