नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी. के. मिश्रा तसेच ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन यांच्या नावांची शिफारस कॉलिजियमने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडून मंगळवारी याबाबतची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली.
विश्वनाथन यांच्या नावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तर ते 11 ऑगस्ट 2030 नंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनू शकतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची मंजूर संख्या 34 इतकी असून सध्या 32 न्यायमूर्ती कार्यरत आहेत. अलीकडेच दिनेश माहेश्वरी आणि एम. आर. शहा हे न्यायमूर्ती पदावरून सेवानिवृत्त झाले होते.
हेही वाचा