Amazon Lays Off : अ‍ॅमेझॉनकडून भारतातील 500 कर्मचाऱ्यांना नारळ | पुढारी

Amazon Lays Off : अ‍ॅमेझॉनकडून भारतातील 500 कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amazon Lays Off  : टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात थांबण्याची चिन्हे नाहीत. अ‍ॅमेझॉन इंडियाकडून नुकतेच संपूर्ण भारतातील 500 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. एनडीटीव्हीने या संदर्भात वृत्त दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार Amazon ने भारतातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वर्टिकलमध्ये कामावरून काढून टाकले आहे

अ‍ॅमेझॉनमधील वेब, सेवा, मानव संसाधन तसेच समर्थन विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी मार्चमध्ये जाहीर केलेल्या व्यापक टाळेबंदीचा एक भाग म्हणून या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. जॅसी यांनी जाहीर केलेल्या या टाळेबंदीत आतापर्यंत एकूण 9000 कर्मचारी प्रभावित झाले आहे. Amazon Lays Off

जस्सी यांनी जेव्हा ही घोषणा केली होती, त्यावेळी ते म्हणाले होते की, प्राधान्यक्रम आणि अर्थव्यवस्थेबद्दलच्या अनिश्चिततेच्या चालू विश्लेषणामुळे हा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्याने गेल्या वर्षीचा बराचसा भाग ई-कॉमर्सच्या वाढीतील तीव्र मंदीशी जुळवून घेण्यात घालवला. त्याचाही परिणाम या कर्मचारी कपातीच्या धोरणावर झालेला दिसत आहे. Amazone India Layoff

कंपनीने जानेवारीमध्ये पहिल्यांदा घोषणा केली होती की जगभरातील टेक स्टॉक्सच्या घसरणीनंतर अंदाजे 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाईल. सूत्रांचे म्हणणे आहे की भारतातील अ‍ॅमेझॉनच्या ई-कॉमर्स व्यवसायाने देशातील आव्हानात्मक बाजारपेठेची परिस्थिती अधोरेखित करून, वाढीचा वेग मंदावला आहे. Amazon Lays Off

Amazon Layoffs | ॲमेझॉनने २७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नोकरकपातीचे भयानक वास्तव आले समोर

Amazon Layoffs : अॅमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात; नऊ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Back to top button