Karnataka Election Result 2023 : कर्नाटकचा निकाल हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम – अशोक गेहलोत | पुढारी

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकचा निकाल हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम - अशोक गेहलोत

पुढारी ऑनलाइन डेस्क : #Karnataka Election Result 2023 : कर्नाटकचा निकाल हा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा आज निकाल आहे. सध्या कर्नाटकात मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीत काँग्रेसने 119 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यालयात मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कर्नाटकच्या निकालांवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया ट्विट करून दिली आहे.

#Karnataka Election Result 2023 : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे. एवढेच नव्हे तर आगामी राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

#Karnataka Election Result 2023 : अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकात जे वातावरण पाहायला मिळाले, त्याचा परिणाम #कर्नाटक निवडणुकीच्या निकालात स्पष्टपणे दिसून येत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होईल.”

हे ही वाचा :

Karnataka election results 2023 | कर्नाटकात काँग्रेस निर्णायक बहुमताकडे, स्वबळावर सरकार स्थापन करणार

Karnataka Election Results 2023 : धारवाडमधून काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी, एक दिवसही प्रचार न करता मारली बाजी

Back to top button