Helmet : त्याने ‘हेल्मेट’ घातले नाही, अन् रोड सेफ्टी सीसीटीव्हीमुळे प्रेयसी सोबतचे संबंध पत्नी समोर झाले उघड | पुढारी

Helmet : त्याने 'हेल्मेट' घातले नाही, अन् रोड सेफ्टी सीसीटीव्हीमुळे प्रेयसी सोबतचे संबंध पत्नी समोर झाले उघड

पुढारी ऑनलाइन डेस्क : Helmet : केरळमध्ये एका व्यक्तीला हेल्मेट न घालणे चांगलेच महागात पडले आहे. हेल्मेट न घातल्याने त्याचा संसार मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. हेल्मेट न घातल्यामुळे त्याचे प्रेसयीसोबतचे विवाहबाह्य कथित संबंध पत्नीसमोर आले. त्यामुळे पत्नीसोबत वाद होऊन पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार त्याला थेट अटक झाली आहे. वाचा नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण….

केरळमधील एका व्यक्तीने रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. केरळमध्ये रस्त्यांवर सेफ्टी कॅमेरा बसवण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्याने 25 एप्रिल रोजी हेल्मेटशिवाय (Helmet) स्कूरटवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे फोटो क्लिक केले होते. ही गाडी त्याच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत असल्याने, तिला फोटोसह उल्लंघनाचा तपशील आणि दंड भरावा लागणारा तपशील तिच्या पत्त्यावर पाठवण्यात आला…

Helmet : प्रकरणातील ट्विस्ट

हेल्मेट न घातल्याबद्दल सीसीसटीव्ही फुटेजने कॅच केलेले फोटो दंडासाठी थेट घरी पोहोचले आणि या व्यक्तीच्या आयुष्यात मोठा भूकंप झाला होता. कारण या फोटोमध्ये तो एका अन्य महिलेसोबत स्कूटरवरून जात होता. हे फोटो पाहिल्यानंतर महिलेने पतीला या अन्य महिलेबाबत विचारणा केली. त्यावर आपण तिला फक्त लिफ्ट दिली होती. आपला तिच्याशी काहीही संबंध नाही, असे आपल्या पत्नीला स्पष्ट केले. मात्र, पतीच्या या म्हणण्यावर पत्नीचा विश्वास बसला नाही. त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.

पत्नी पोहोचली थेट पोलीस ठाण्यात

अखेर या वादाने उग्र रूप धारण केले. परिणामी 5 मे रोजी पत्नीने करमना पोलिस ठाण्यात पती विरोधात आपल्यावर आणि आपल्या तीन वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला.

पत्नीच्या तक्रारीनुसार पतीला ताब्यात घेण्यात आले. त्यावर PC 321 (स्वेच्छेने दुखापत करणे), 341 (चुकीचा प्रतिबंध) आणि 294 (अश्लील कृत्ये) आणि बाल न्याय कायद्याच्या कलम 75 (मुलावर प्राणघातक हल्ला किंवा दुर्लक्ष) अंतर्गत अटक नोंदवण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. Helmet या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यात आले, ज्याने त्याला नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा :

हेल्मेट व सीट बेल्ट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी : ॲड. हर्षीत खंडार

विनाहेल्मेट युवकावर पोलिसाने थेट गोळ्या झाडल्या

Back to top button