Seeds For Kharif Season : खरीप हंगामासाठी बियाण्यांचा पुरेसा साठा ठेवा : केंद्र सरकारचा राज्यांना सल्ला  | पुढारी

Seeds For Kharif Season : खरीप हंगामासाठी बियाण्यांचा पुरेसा साठा ठेवा : केंद्र सरकारचा राज्यांना सल्ला 

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यांनी मान्सून मधील ‘सर्वात वाईट परिस्थिती’चा सामना करण्यासाठी तयार राहावे, असा सल्ला बुधवारी केंद्र सरकार ने दिला आहे.यंदा मान्सून मधे ‘अल निनो’मुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थिती लक्षात घेता केंद्राकडून या सूचना करण्यात आल्या आहेत.कमी पर्जन्यमान झाल्यास खरीप पेरणी हंगामासाठी बियाण्यांची पुरेसा साठा ठेवण्याचा सल्ला केंद्राने राज्यांना दिला असल्याचे कळतेय.
अल निनो मुळे नैऋत्य मोसमी हंगामात भारतात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने एप्रिल महिन्यात वर्तवला होता. आगामी खरीप पेरणीच्या हंगामाची रणनीती तयार करण्यासाठी नवी दिल्लीत कृषी खरीप मोहीम-२०२३ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
परिषदेचे उदघाटन करतांना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.लागवड खर्च कमी करीत उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या सूचना यावेळी कृषी मंत्र्यांनी दिल्या. शेतीत ‘नफा हमी’ काळजी गरज आहे. तंत्रज्ञान वापरामुळे शेती फायदेशीर ठरू शकते.शेतीत फायदा झाला नाही तर, येत्या काही वर्षात तरुण पिढी शेती कडे वळणार नाही, अशी चिंता तोमर यांनी व्यक्त केली.
कृषी हा राज्याचा विषय असल्याने चांगल्या परिणामांसाठी राज्य सरकारांनी केंद्रीय कार्यक्रम आणि निधीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.लोकसंख्येच्या वाढीसह मागणी वाढणार असल्याने प्रमुख पिकांची उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्याच्या गरजेवरही केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.

Back to top button