Covid १९ : कोरोनातून २४ तासात ७६९८ रुग्ण बरे, ३७२० नवीन प्रकरणे | पुढारी

Covid १९ : कोरोनातून २४ तासात ७६९८ रुग्ण बरे, ३७२० नवीन प्रकरणे

पुढारी ऑनलाइन डेस्क : Covid 19 : भारतात गेल्या २४ तासात ३७२० नवीन प्रकरणे आणि ७६९८ बरे झाले आहेत; सक्रिय केसलोड  ४०,१७७ आहे. एएनआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत कालपेक्षा आज पुन्हा वाढ दिसून आली. मात्र, संपूर्ण आठवइ्यात कोरोना रुग्णसंख्येचा दर ५० टक्क्यांनी खाली आला आहे. आठवडाभरापूर्वी कोरोना रुग्णसंख्या सात हजारापेक्षा जास्त नोंदवली गेली होती. ते प्रमाण आता निम्म्यावर आले आहे. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आठवडाभराच्या आकडेवारीचा विचार करता परिस्थिती दिलासादायक आहे.

दिलासादायक ! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येसह मृत्युदरातही घट

COVID-19 Updates: कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा किंचीत घट; गेल्या २४ तासात ४,२८२ रूग्णांची नोंद

Back to top button