पॅरासिटामॉलसह 53 औषधे दर्जा तपासणीत फेल

जीवनसत्त्वे, मधुमेह, रक्तदाबावरील औषधांसह काही प्रतिजैविकांचाही समावेश
53 drugs, including paracetamol, failed quality checks
पॅरासिटामॉलसह 53 औषधे दर्जा तपासणीत फेल Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

प्रतिजैविके, पॅरासिटामॉलसह मधुमेह, रक्तदाबावरील औषधांसह 53 औषधे दर्जा चाचणीत अपयशी ठरली आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या देशातील सर्वात मोठ्या औषध नियामक संस्थेने या औषधांची यादी बुधवारी जाहीर केली.या यादीत व्हिटॅमिन सी आणि डी-3 टॅब्लेट शेल्कल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटिसीड पॅन-डी, पॅरासिटामॉल गोळ्या आयपी 500 एमजी, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराईड आणि उच्च रक्तदाब औषध टेलमिसार्टनही गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरले आहे.

53 drugs, including paracetamol, failed quality checks
कोल्हापूर : कोरोना काळातील औषधे मुदतबाह्य, पण घोटाळ्याची चौकशीच नाही

क्लोनाझेपम टॅबलेट, वेदनाशामक डायक्लोफेनाक, श्वसनरोगावरील अँब्रोक्सोल, बुरशीरोधक फ्लुकोनाझोल आणि काही मल्टिव्हिटॅमिन आणि कॅल्शियम गोळ्यांचाही बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत समावेश आहे. ही औषधे हेटेरो ड्रग्ज, अल्केम लेबोरेटरीज, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड, कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडसारख्या बड्या कंपन्यांनी बनवलेली आहेत. याआधी चालू वर्षात ऑगस्टमध्ये 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घालण्यात आली होती.

53 drugs, including paracetamol, failed quality checks
Pimpri News : ऑनलाइन विक्रीस बंदी, तरीही मिळताहेत प्रतिबंधित औषधे

53 पैकी 5 औषधे बनावट

पोटाच्या संसर्गासाठी दिले जाणारे मेट्रोनिडाझोल हे औषध हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडने तयार केले आहे, तेही या चाचणीत अपयशी ठरले आहे. टोरेंट फार्मास्युटिकल्सच्या शेल्कल गोळ्याही चाचणीत अपयशी झाल्या. चाचणीत अयशस्वी ठरलेल्या 53 औषधांपैकी 5 औषधे बनावट होती. ही बनावट औषधे आम्ही बनवलेली नसून, आमच्या नावाखाली बाजारात खपत असल्याचे औषध उत्पादक कंपन्यांनी म्हटलेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news