BJP vs AAP Poster War : ‘आप के चोर मचाए शोर’ भाजपचे आप विरोधात सिनेस्टाइल पोस्टर

BJP Vs Aap
BJP Vs Aap
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : राजधानी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरूच आहे. भाजपने पुन्हा एकदा आम आदमी पक्ष विरुद्ध मंगळवारी पोस्टरबाजी केली आहे. भाजपने पुन्हा एकदा सिनेस्टाइल पोस्टर तयार करून एका चित्रपटाच्या पोस्टरचे स्वरूप त्याला दिले आहे. ज्यामध्ये चोर मचाए शोर हा चित्रपट आहे याची निर्मिती आप कट्टर भ्रष्टाचारी पक्षाने केली आहे, असे हे व्यंगात्मक पोस्टर भाजपने प्रसिद्ध केले आहे. भाजप दिल्लीच्या ट्विटर हँडलवर हे पोस्टर पब्लिश करण्यात आले आहे.

BJP vs AAP Poster War : कसे आहे हे पोस्टर

या पोस्टरमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी मंत्री मनिष सिसोदिया आणि आपचे अन्य नेत्यांची मोठी छायाचित्रे लावली आहे. मनिष सिसोदिया यांच्या हातात एक दारूची बाटली दाखवली आहे. तर त्याच्या शेजारी सत्येंद्र जैन हे आहे आणि दोघांच्या चित्रावर एक हतकडीचे चित्र देखील आहे. जे हे सूचित करत आहे की दोघे जेलमध्ये आहे.

या पोस्टरवर आप कट्टर करप्ट प्रेझेंट्स हे वरच्या बाजूला लिहेले असून अरविंद केजरीवाल याच्या छायाचित्राखाली चोर मचाए शोर असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. जेणेकरून आप कट्टर करप्टची निर्मिती असलेला चोर मचाए शोर हा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शक अरविंद केजरीवाल आहे, असे व्यंग यातून दिसत आहे.

BJP vs AAP Poster War : डिग्री प्रकरणावरील आशिष सूद यांचे पोस्टर आधीच व्हायरल

हे पोस्टर लावण्याच्या एक दिवस आधी भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष सूद यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पोस्टर लावले होते. ज्यामध्ये 'डिग्री एक बहाणा आहे, केजरीवाल यांना भ्रष्टाचारावरून लक्ष हटवायचे आहे' असे लिहिले होते.

नुकतेच सीएम केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, देशाच्या पंतप्रधानांना एकाच दिवसात अनेक निर्णय घ्यावे लागतात. अशा स्थितीत भारताचे पंतप्रधान सुशिक्षित नसावेत का? त्यात त्यांनी विचारले होते की, पंतप्रधानांची पदवी बनावट आहे का? आमचे पंतप्रधान सुशिक्षित असतील तर त्यांनी पदवी दाखवावी, असे ते म्हणाले होते.

BJP vs AAP Poster War : यापूर्वीही लावले होते सिनेस्टाइल पोस्टर

भाजपने अशा प्रकारे यापूर्वी देखील सिनेस्टाइल पोस्टर बाजी केली होती. दिल्ली महापालिकेत झालेल्या खडाजंगीवेळी देखील त्यांनी आप च्या एका महिला नेत्या विरोधात अशाच प्रकारे सिनेस्टाइल पोस्टर लावले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news