पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात अवजड वाहनांच्या वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर १२ जखमी झाले आहेत. याची माहिती अशी माहिती पोलिसांनी रविवारी (दि.27) दिली. याचबरोबर या घटनेची माहिती वृत्तसंस्था पीटीआयने सोशल मीडिया हँन्डल 'एक्स'वर दिली आहे. (Betul Accident )
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.27) सकाळी ७ च्या सुमारास बैतुल-परासिया रोडवरील हनुमान डोलजवळ ट्रॅक्टर-ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले. यासोबतच बैतूल-अथनेर रोडवर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा 12 वाजता हा अपघात झाला. मयत झालेले तिघेही फर्निचरचे काम करून घरी परतत होते. बैतुलच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) कमला जोशी यांनी सांगितले की, बळी पडलेले मजूर हे ट्रॅक्टर-ट्रॉलीतून बैतुल रेल्वे स्थानकावरून आपल्या गावी घरी परतत होते. (Betul Accident )