Bengaluru Missing Case : एक्स गर्लफ्रेंडचा धसका! ट्रॅफिक जाममध्ये बायकोला सोडून नव-याने ठोकली धूम… | पुढारी

Bengaluru Missing Case : एक्स गर्लफ्रेंडचा धसका! ट्रॅफिक जाममध्ये बायकोला सोडून नव-याने ठोकली धूम...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bengaluru Missing Case : बंगळुरमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका नवविवाहित पुरुषाने वाहतूक कोंडीत त्यांची कार अडकलेली असताना बायकोला कारमध्येच सोडून पळ काढला. ही घटना 5 मार्च रोजी घडली असून नवरा नंतर पुन्हा न आल्याने बायकोने दुस-या दिवशी पोलिस ठाणे गाठले. कुटुबीयांचा आरोप आहे की त्याची एक्स गर्लफ्रेंड त्याला ब्लॅकमेल करत होती त्यामुळे त्याने पळून जाण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. फायनान्शिअल एक्सप्रेसने याची बातमी दिली आहे.

याची सविवस्तर माहिती अशी की, तक्रारदार महिलेचा गेल्या महिन्यात 15 फेब्रुवारीला विवाह झाला होता. तिचा नवरा हा तिच्या वडिलांच्या व्यवसायात काम करत होता. तिच्या वडिलांचा व्यवसाय कर्नाटक आणि गोव्याच्या बाहेरपर्यंत होता. तिचा नवरा काही दिवसांपासून सातत्याने उदास दिसत होता. तिने पतीला कारण विचारले असता. तिला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडविषयी कळाले…

Bengaluru Missing Case : प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची एक्स गर्लफ्रेंडची धमकी

महिलेच्या पतीने तिला तिच्या एक्स गर्लफ्रेंड विषयी सांगितले जी त्याला सध्या ब्लॅकमेल करत आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्यांचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात दिली आहे. यावेळी महिलेने पतीला धीर दिला होता. तसेच कुटुंबातील इतर लोकांना देखील याबाबत सांगितले होते. त्यावेळी त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील त्याला ते त्याच्या पाठीशी उभे राहतील, असे सांगितले होते.

Bengaluru Missing Case : चर्चमधून परत येताना बायकोला सोडून नव-याने ठोकली धूम…

नंतर 5 मार्च रोजी 2.15 च्या सुमारास हे जोडपे चर्चमधून परत येत होते. त्यावेळी त्यांची कार महादेवपुराच्या आयटी कॉरिडॉरमध्ये पै लेआउटजवळ वाहतूक कोंडीत अडकली. यावेळी तिचा पती समोरच्या सीटवर बसा होता. त्याने अचानक दरवाजा उघडला आणि पळ काढला. महिलेने त्याचा पाठलाग केला पण त्याला पकडता आले नाही. नंतर तो घरी देखील आला नाही. तसेच तिनेच कुटुंबातील अन्य सदस्य आणि मित्रांकडे विचारणा केली असता तो तिथेही पोहोचला नव्हता. त्यामुळे महिलेने महादेवपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

हे ही वाचा :

महिंद्रा समूह पुण्याबरोबरच नाशिकमध्येही गुंतवणूक करणार, आमदार फरांदे यांच्या प्रश्नावर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Nirmiti Sawant : ‘कन्यादान’ मालिकेत निर्मिती सावंत आत्याच्या भूमिकेत

Back to top button