Sukesh on Kejariwal : महाठग सुकेश चंद्रशेखरचे CM केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप म्हणाला, | पुढारी

Sukesh on Kejariwal : महाठग सुकेश चंद्रशेखरचे CM केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप म्हणाला,

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sukesh on Kejariwal : महाठग सुकेश चंद्रशेखर याने आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केले आहे. सुकेश सध्या 200 कोटीच्या मनीलाँन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या तिहाड तुरुंगात बंद आहे. त्याने थेट तुरुंगातून चिठ्ठी लिहून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले आहे. वाचा सुकेशने लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हटले आहे…

Sukesh on Kejariwal :अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी

सुकेशने सीएम केजरीवाल आणि त्यांच्या सरकारवर गंभीर आरोप लावले आहे. सुकेश म्हणाला तुम्ही मला ठग म्हणता पण सगळ्यात मोठे घोटाळेबाज तर तुम्हीच आहात. वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी एक हजार कोटी रुपयांचे कमीशन घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर त्याने आरोप लावले आहे की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी गरीब मुलांच्या शिक्षणातही मोठा घोटाळा केला आहे. मुलांच्या शिक्षणात स्टेशनरीमध्ये घोटाळा करण्याचे आरोप करत त्याने अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

Sukesh on Kejariwal : मुलांच्या शैक्षणिक टॅबलेटमध्ये घोटाळा

सुकेशने आरोप केला आहे की मुलांना शाळेत जे टॅबलेट वाटायचे होते त्यासाठी आधी मसुदा तयार केला होता. ते टॅबलेट माझ्या माध्यमातून एका चायनीज कंपनीकडून खरेदी केले जाणा होते. मात्र दुस-या कंपनीने 20 टक्के कमीशन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर केजरीवाल सरकारने टेंडर माझ्याऐवजी अन्य दुस-याला देण्याचा निर्णय घेतला.

Sukesh on Kejariwal : ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, सिसोदिया, सत्येंद्रने माझ्या वाढदिवशी गायले होते

सुकेशने मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविषयी देखील चिठ्ठीत लिहिले आहे. त्याने लिहिले आहे, ”25 मार्च 2017 सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी माझ्या वाढदिवशी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे.. हे गाणे गायले होते. मात्र, पैशांच्या आमिषापोटी त्यांनी त्यांचे वचन मोडले. तसेच एका आंतरराष्ट्रीय न्यूजपेपरमध्ये सरकारची स्तुती करणारा जो लेख छापला गेला होता तो देखील सिसोदिया आणि जैन यांनी त्याच्या माध्यमातूनच छापला होता.

Sukesh on Kejariwal : माझ्या जबाबामुळे जैन यांचा राजीनामा

सुकेश म्हणाला की, चार दिवसांपूर्वी मी ईडीसमोर सत्येंद्र जैन आणि हवाला ऑपरेटर चतुर्वेदी यांच्याबाबतची गुपिते उघड केली. त्यानंतर जैन यांना मंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. जो तुम्ही गेल्या नऊ महिन्यांपासून घेतला नव्हता.

हे ही वाचा :

celebrities fraud : सेलेब्सच्या नावाने ५० लाखांची फसवणूक, टोळीतील एकटा बी टेक झालेला!

IND vs AUS 3rd Test | इंदूर कसोटीतील पराभवाचे रोहित शर्माने सांगितले कारण…

Back to top button