युनोच्या बैठकीतही कैलासचा सहभाग! | पुढारी

युनोच्या बैठकीतही कैलासचा सहभाग!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला आरोपी नित्यानंद स्वामी याने स्थापन केलेल्या कैलास या देशाने नुकत्याच जीनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) बैठकीत भाग घेतल्याची माहिती समोर आली आहे. विजयप्रिया नित्यानंद ही महिला कैलासाची कायमस्वरूपी राजदूत म्हणून जीनिव्हा येथील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या बैठकीत सहभागी झाली होती. नित्यानंद याचा भारताकडून छळ होत असल्याचा आरोप तिने केला.

कैलासाचे प्रतिनिधी म्हणून एन. कुमार हेही बैठकीत बोलले. कैलास हा देश इक्वेडोरच्या किनारपट्टीवर असून, या देशाचा स्वतःचा पासपोर्ट, ध्वज आणि रिझर्व्ह बँकही आहे. पृथ्वीवरील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून या देशाने स्वत:चे वर्णन स्वत:च्या संकेतस्थळावर केले आहे.

भारतातून 4 वर्षांपूर्वी फरार

बलात्कार, छळ, अपहरण, मुलींना ओलिस ठेवणे आदी प्रकरणांतील आरोपी नित्यानंद 2019 मध्ये भारतातून फरार झाला होता.
बंगळूरलगतच्या रामनगर न्यायालयाने बलात्कार प्रकरणात नित्यानंदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. गुजरातमध्येही त्याच्याविरुद्ध असेच गुन्हे दाखल आहेत. अहमदाबादेत त्याचा आश्रम होता. पोलिस अद्यापही त्याचा शोध घेत आहेत.

Back to top button