amazon shopping : अ‍ॅमेझॉनचा मेगा सेल आजपासून सुरू

amazon shopping : अ‍ॅमेझॉनचा मेगा सेल आजपासून सुरू
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अ‍ॅमेझॉनच्या वतीने मेगा ऑफर सेल सुरू झाला असून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तयार कपडे, सौंदर्य प्रसाधनांसह चप्पल, फूड आणि बेव्हरीजवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉनने हा मेगा खजिना ग्राहकांसाठी खुला केला आहे. या धमाकेदार ऑनलाईन सेलला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याआधीच अ‍ॅमेझॉनने ग्राहकांना मोठी सूट देऊ केली आहे. यात टीव्ही, फ्रिज, डबल डोअर वॉशिंग मशिन या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.

ग्राहकांना आपल्या आवडीच्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, डिव्हाईस आणि इतर उत्पादनांवर लाभदायक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. एचडीएफसी बँकेच्या डेबीट आणि क्रेडिट कार्डधारकांसाठी खरेदीवर 10 टक्के तत्काळ सूट देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य बँकांच्या डेबीट आणि क्रेडिट कार्डवरही सवलत मिळणार आहे.

शिवाय एक्स्चेंज ऑफर्सचाही लाभ घेता येणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम 12 हा 12,999 रुपये किमतीचा मोबाईल फोन 9,499, रिडमी 9 हा 10,999 रुपये किमतीचा मोबाईल 8,799 रुपयांत, ओप्पो ए 31 हा 15,990 रुपये किमतीचा मोबाईल 11,499 रुपयांना; तर रिडमी नोट 10 एस हा 16,999 रुपये किमतीचा मोबाईल 12,999 रुपये किमतीत मिळणार आहे.

24,999 रुपये किमतीचा रिडमी 32 इंची स्मार्ट एलईडी टीव्ही 14,999 रुपयांत मिळणार आहे.वायरलेस एअर बडस्, ब्लूटूथ डिव्हायसेस, पेन ड्राईव्हज् अशा उत्पादनांवरही भरघोस सवलती देण्यात येत आहेत.विशेष म्हणजे पहिल्या ऑर्डरसाठी कोणतेही डिलिव्हरी चार्जेस आकारण्यात येणार नाहीत.

लहान मुलांपासून महिलांचे तयार कपड्यांचे विविध ब्रँड

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत आणि महिलांच्या तयार कपड्यांच्या विविध ब्रँडच्या रेंजवर भरघोस सूट देण्यात आली आहे.

विविध कंपन्यांची ब्रँडेड घड्याळे, ज्वेलरी आणि शूजवरही 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे.कपड्यांच्या ब्रँडमध्ये मॅक्स, बिबा, लेव्हिस; सौंदर्य प्रसाधने आणि ज्वेलरी उत्पादनांमध्ये लॅक्मे, झवेरी पर्ल्स आणि मेबिलाईन; तर शूज, घड्याळे आणि लगेज बॅग्जमध्ये अनुक्रमे बाटा, टायटन आणि अमेरिकन टुरिस्टर या उत्पादनांचा समावेश आहे.

फॅशन आणि सौंदर्य प्रसाधनांच्या तीन हजारपर्यंतच्या खरेदीवर 300 रुपये कॅशबॅक, होम आणि किचन अप्लायन्सेसच्या 4000 रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 400 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

फूड आणि बेव्हरीजवर 40 टक्के डिस्काऊंट, डायपर्स आणि वाईप्सवर 55 टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे.प्रेस्टीज कोम्बो कुकर, विप्रो, बजाज, फिलिप्स लेक्स्टॉन आणि पिजीन कुकवेअर सेटस्वर एक्स्ट्रा 10 टक्के कूपन डिस्काऊंटही देण्यात येणार आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये करा खरेदी आणि मिळवा टोमॅटो एफएमकडून गिफ्ट

दसरा-दिवाळीचे वेध लागले की सगळीकडे खरेदीचा उत्साह वाढत जातो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऑफर शोधत राहतो. मात्र, आता अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये खरेदीचा धमाका सुरू झाला आहे. रविवार, 3 ऑक्टोबर, सोमवार, 4 ऑक्टोबर आणि मंगळवार, 5 ऑक्टोबर या दिवशी खरेदी करून, केलेल्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट काढून टोमॅटो एफएमच्या 9763943943 या नंबरवर व्हॉटस् अ‍ॅप करा, मंगळवार, दि. 5 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत. त्यातून लकी विजेत्यांना एक आकर्षक गिफ्ट मिळणार असून ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सवलती आणि एक्स्चेंज ऑफर्स
विविध खरेदीवर आकर्षक कॅशबॅक
क्रेडिट, डेबिट कार्डवर डिस्काऊंटचा धमाका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news