Congress National Convention : रायपूरमध्ये आजपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन, निवडणुकांसाठी आखणार रणनीती | पुढारी

Congress National Convention : रायपूरमध्ये आजपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन, निवडणुकांसाठी आखणार रणनीती

पुढारी ऑनलाइन डेस्क : Congress National Convention : रायपूरमध्ये काँग्रेसचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन सुरु झाले आहे. या वर्षी कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेससाठी हे अधिवेशन अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचे हे दुसरे मोठे आयोजन आहे. याशिवाय 2024 मध्ये होणा-या लोकसभेच्या निवडणुकांची रणनीती देखील या अधिवेशनात आखली जाऊ शकते.

या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्टीयरिंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे असणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी खर्गे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Congress National Convention : निवडणुकांसाठी रोड मॅप तयार होणार

काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन 2018 मध्ये दिल्लीत झाले होते. मात्र, या अधिवेशनानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विशेष फायदा झाला नव्हता. त्या अनुभवावरून काँग्रेस प्रत्येक पाऊल विचार करून उचलत आहे. यावेळी गांधी परिवाराबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी आहे. तसेच भारत जोडो सारखे अभियान काँग्रेसकडून राबवले जात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस या अधिवेशनात रणनीती आखू शकते. याविषयी अधिवेशनात चर्चा होईल.

Congress National Convention : अधिवेशनात या मुद्द्यांवर होणार चर्चा

या अधिवेशनात देशातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल. जे या वर्षी होणा-या राज्यांच्या विधानसभा निवडणूक आणि पुढील वर्षात येणा-या लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचे ठरतील. पुढील दोन वर्षांसाठी काँग्रेसची काय रणनीती असेल याची तयारी अधिवेशनात केली जाईल.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश तिवारी यांनी अधिवेशनातील मुद्द्यांबाबत सांगितले की, अधिवेशन आमच्यासाठी खास आहे. देशातील विविध प्रश्नांसाठी 7 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याबाबत देशव्यापी चर्चा होणार आहे. तसेच पक्षाच्या घटनेत करावयाच्या दुरुस्तीबाबतही येथे चर्चा होणार आहे. याशिवाय शेती, दलित आणि दुर्बल घटकांवर अत्याचार होत असल्याने सामाजिक न्याय, संविधान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांबाबत, आर्थिक धोरण, देशात कोणते धोरण असावे, याबाबतचा प्रस्ताव आहे.

हे ही वाचा :

IND vs AUS Test : खेळपट्टीच्या वादावर ऑस्ट्रेलियाला आयसीसीने डावलले

रशिया-अमेरिकेचे अंतराळवीर अडकले अवकाशात, रशियाने पाठवले स्पेसशिप Russia launches Spaceship

Back to top button