Indian Navy : भारताचे मोठे पाऊल, दक्षिण चीन समुद्रात भारतीय पाणबुडी तैनात | पुढारी

Indian Navy : भारताचे मोठे पाऊल, दक्षिण चीन समुद्रात भारतीय पाणबुडी तैनात

पुढारी ऑनलाइन डेस्क : Indian Navy : भारताने सामरिक क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताने दक्षिण चीन समुद्री विवादात इंडोनेशियात स्वतःची पाणबुडी पाठवली आहे. भारताने आपली पाणबुडी आईएनएस सिंधुकेसरी ही इंडोनेशियात पाठवली आहे. आशियायी देशात आपली कुटनीती आणि सैन्याची ताकद वाढवण्यासाठी इंडोनेशियाच्या जकार्ता येते भारताने आपली पाणबुडी पाठवली आहे. 3000 टन वजनी आईएनएस सिंधुकेसरी बुधवारी सुंदा खाडी मार्गे जकार्ताला पोहोचली आहे.

याविषयी इंडोनेशियन नौसेनाने ट्विट करून लिहिले आहे ”भारत आणि इंडोनेशियामधील संबंध मजबूत करण्यासाठी, इंडोनेशियाच्या नौदलाने जकार्ता येथे भारतीय पाणबुडी INS सिंधुकेसरीचे स्वागत करते.” माध्यमांच्या अहवालानुसार, इतक्या लांब पाणबुडी तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामधून भारताची नौसेना पाण्याच्या आत युद्ध लढण्याच्या क्षमतेचा अंदाजा लावू शकतो.

Indian Navy : काय आहे चीनची रणनीती

चीन ने दक्षिण चीनी समुद्रातील मोठ्या भागावर चीनने आपला दावा केला आहे. त्यामुळे चीनचा इंडोनेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ताईवान आणि ब्रुनेई या अन्य आशियायी देशांसह विवाद सुरू आहे. तर या सर्व देशांनी देखील दक्षिण चीन समुद्रात आपला दावा सांगितला आहे. परिणामी सध्या दक्षिण चीन समुद्राबाबत सध्या आशियायी देशांमध्ये तणाव सुरू आहे. चीनने येथे एकतरफी साम्राज्य निर्माण करण्यासाठी अनेक कृत्रिम द्वीपांचे निर्माण करून तेथे आपल्या नौसेनेला तैनात केले आहे.

Indian Navy : भारतीय पाणबुडीचे महत्व

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय पाणबुडी इंडोनेशियाच्या तटावर तैनात होणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारताने नुकतीच ब्रह्मोस मिसाइल फिलिपिन्सला विकली आहे. गेल्या आठवड्यात फिलिपिन्सच्या 21 मरीन जवानांनी ब्रह्मोसच्या एंटी शिप सुपरसोनिक क्रूज मिसाइलची ट्रेनिंग पूर्ण केली आहे. त्यांना ब्रह्मोसचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स इत्यादींची माहिती देण्यात आली आहे.
भारताने गेल्या आठवड्यात सिंगापूरच्या नौसेनेसह अग्नि वॉरियर नावाने युद्धाभ्यास केला आहे. तसेच मलेशिया आणि इंडोनेशियासह देखील युद्धाभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आशियायी देशांची मदत करत आहे ही भारताची चीनला शह देण्याची आणि सामना करण्याच्या रणनितीचा एक भाग आहे. याशिवाय भारत आणि इंडोनेशियाच्या नौसेनेना मिळून एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय मेरीटाइम सीमेत सोबत मिळून पेट्रोलिंग सुद्धा करते. गेल्या वर्षी भारताने इंडोनेशियासह दोन वेळा पेट्रोलिंग केले आहे.

या सर्व एकूण पार्श्वभूमीवर इंडोनेशियाच्या तटावर भारताने आपली पाणबुडी तैनात करणे हा भारताच्या रणनीतीचा एक महत्वपूर्ण भाग आहे. Indian Navy

हे ही वाचा

हर्षवर्धन सदगीरची पौड येथील कुस्तीत बाजी

 

Back to top button