पाटणा : वृत्तसंस्था लालू यादव यांचे किडनी प्रत्यारोपण 5 डिसेंबर 2022 रोजी सिंगापूरमध्ये झाले. यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी स्वत:ची किडनी त्यांना दान केली होती. नंतरच्या संपूर्ण उपचाराअंती लालू यादव भारतात परतले आहेत.
याबाबत त्यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट केले आहे. लालू यांच्या 7 मुली आणि 2 मुलांपैकी रोहिणी या द्वितीय क्रमाकांच्या कन्या आहेत. मी, एक मुलगी म्हणून माझे कर्तव्य बजावले आहे. माझ्या वडिलांना बरे करून पुन्हा तुमच्यात पाठवत आहे. आता तुम्ही माझ्या वडिलांची काळजी घ्यायची आहे, असे या ट्विटमध्ये रोहिणी यांनी म्हटले आहे.