गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या दोन साथीदारांना अटक

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या दोन साथीदारांना अटक
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला याची हत्या घडवून आणण्यात आल्याचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्या दोन साथीदारांना दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. रोहिणी भागातील सेक्टर 28-29 मध्ये पोलीस आणि आरोपींदरम्यान गोळीबार झाला. त्यानंतर संदीप आणि जतीन नावाच्या लॉरेन्सच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली.

लॉरेन्सचे काही साथीदार रोहिणी भागात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार उत्तर विभागाच्या विशेष पथकाने आरोपी लपून बसलेल्या ठिकाणी घेराबंदी केली. यावेळी दोन्ही बाजुंकडून गोळीबार झाला. त्यानंतर पोलिसांनी हरियानातील झज्जरचा रहिवाशी संदीप तसेच दिल्लीतील बाबा हरिदास नगरचा रहिवाशी जतीन यांना अटक केली. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या अनेक साथीदारांना पोलिसांनी मागील काही काळात पकडले आहे. त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला याची बिष्णोई तसेच कॅनडात लपून बसलेला गँगस्टर गोल्डी बराड यांनी गतवर्षी हत्या घडवून आणली होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news