नाशिक-शिर्डी मार्गावर अपघात, मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर | पुढारी

नाशिक-शिर्डी मार्गावर अपघात, मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नाशिक-शिर्डी महामार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दहा लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून वरील रक्कम दिली जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. नाशिक-शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ भाविकांना घेवून जाणारी एक बस उलटली होती. या अपघातात दहा लोकांचा मृत्यू झाला होता तर २० प्रवासी जखमी झाले होते. जखमींना शिर्डी तसेच नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button