जीका विषाणू : केरळमध्ये जीकाचे १३ रुग्ण; राज्य अलर्टवर | पुढारी

जीका विषाणू : केरळमध्ये जीकाचे १३ रुग्ण; राज्य अलर्टवर

तिरुवनंतपुरम, पुढारी ऑनलाईन : कोरोना महामारीच्या काळात आता पुन्हा एक जीका विषाणू याचं संक्रमण होत असल्याचं समोर आलेलं आहे. केरळमध्ये जीका विषाणू असल्याचा पहिला रुग्ण सापडल्याचं निदर्शान आलं होतं. शुक्रवारपर्यंत १४ रुग्णांना जीका विषाणुची बाधा झालेली आहे.

राष्ट्रीय विषाणू संस्थेने आणखी १३ रुग्ण असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर केरळला सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केरळात गुरूवारी २४ वर्षांच्या गर्भवती महिलेमध्ये डाससदृष्य आजाराचे निदान झाले होते. जीका विषाणू याचं संक्रमण झाल्याची पहिली रुग्ण होती.

जीका विषाणू यांच्यावर नजर ठेवण्यासाठी तज्ज्ञांची एक केंद्रीय टीम केरळला रवाना झाली आहे. केरळ राज्य सरकारच्या माहितीनुसार १९ नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १३ नमुन्यांमध्ये जीका विषाणू आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

जीका व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांचा डेंगूची लक्षणं आढळतात. ज्यामध्ये ताप, हाडांचे दुखणे, अशी लक्षणं असतात. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जाॅर्ज म्हणाल्या की, जीका विषाणू संक्रमण थांबविण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे.

केंद्राची तज्ज्ञांची टीम केरळला रवाना 

जीका विषाणुवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारला मदत करण्यासाठी तज्ज्ञांची सहा सदस्यांची एक टीम केरळला रवाना झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती शुक्रवारी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले की, “केरळमधून जीका विषाणुचे काही रुग्ण आढळून आलेले आहेत. जीका विषाणुंवर नजर ठेवण्यासाठी आणि राज्य सरकारला मदत करण्याचे निर्देश या टीमला देण्यात आले आहेत. या टीममध्ये आरोग्य तज्ज्ञ, डासप्रणीत रोगांचे तज्ज्ञ आणि एम्सचे काहीचे तज्ज्ञ सामील आहेत.”

अधिक वाचा 

अधिक वाचा : मधमाशांनी बनवले दयावानचे आयुष्य मधाळ

Back to top button