Shares Market : नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्सची 200 अंकांवर उडी, निफ्टी 18,150 वर | पुढारी

Shares Market : नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्सची 200 अंकांवर उडी, निफ्टी 18,150 वर

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shares Market नवीन वर्षाची शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्सने सकारात्मक सुरुवात करून अवघ्या तासाभरात 200 अंकांपर्यंत उडी घेतली. तर निफ्टी देखील 18,150 अंकांनी वर आला आहे. टाटा स्टील, हिंदाल्को टॉप परफॉर्म करत आहेत. मेटल इंडस्ट्री 3 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया अल्प मजबुतीने उघडला. काल डॉलरच्या तुलनेत रुपया 82.7200 वर बंद झाला होता. त्या तुलनेत आज रुपया 82.66 ने उघडला आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला.

Shares Market आज बाजार उघडल्यानंतर अडाणी ट्रान्समिशन लिमिटेड, अशोका लेलँड, टाटा कम्यूनिकेशन्स यांच्यासह मेटल इंडस्ट्रीजने ग्रिप पकडली. तसेच मेटल कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर मागील आठवड्यात कोरोनाच्या सावटमुळे औषध उत्पादन कंपन्या आणि मेडिकल इन्स्ट्रूमेंट कंपन्यांचे शेअर्स वधारले होते. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीला यामध्ये घसरण झाली आहे.

Shares Market बाजार सुरू होण्यापूर्वी अर्थ विश्लेषकांनी नवीन वर्षासाठी अर्थव्यवस्था आणि बाजारातून संमिश्र संकेत आहेत, असे म्हटले आहे. अनेक कंपन्या 2023 मध्ये नियुक्ती कॅपेक्सबद्दल उत्साहित आहेत. हे भारतासाठी चांगले असून यामुळे बाजारात उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते. बँकिंग, भांडवली वस्तू आणि बांधकाम-संबंधित क्षेत्रातून बाजाराला धक्का देणारा परतावा मिळू शकतो, अर्थ विश्लेषकांनी म्हटले आहे.

Shares Market बँक निफ्टी 320 अंकांनी वर उघडला मात्र स्थिर राहण्यासाठी लाभ सोडल्याचे दिसत आहे. स्मॉल-कॅप निर्देशांक शीर्ष लाभधारकांसह, व्यापक बाजार स्थिरता नोंदवत उघडले. ICICI, PNB, IDFC फर्स्ट बँक आणि बंधन बँक हे चांगली कामगिरी करत असल्याने बँक निफ्टी 0.59 टक्के वाढून 43241 वर व्यापार करत आहे.

हे ही वाचा :

Stock Market Updates | वर्ष २०२२ च्या अखेरच्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीने तेजी गमावली, जाणून घ्या आज घडलं बाजारात?

लांडग्यासारखे दिसण्यासाठी त्याने खर्च केले 18 लाख रुपये

Back to top button