Whatsapp Share Wrong Map : व्हॉट्सअ‍ॅपवर मंत्री चंद्रशेखर भडकले; शेअर केला भारताचा चुकीचा नकाशा

Whatsapp Share Wrong Map : व्हॉट्सअ‍ॅपवर मंत्री चंद्रशेखर भडकले; शेअर केला भारताचा चुकीचा नकाशा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा चांगलाच समाचार घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट केलेला भारताचा चुकीचा नकाशा काढून टाकण्याचे निर्देश त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाने याबाबत माफी देखील मागितली आहे. (Whatsapp Share Wrong Map)

मंत्री चंद्रशेखर यांचे सोशल मीडियाला निर्देश (Whatsapp Share Wrong Map)

मंत्री चंद्रशेखर यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एक निर्देश जारी केली, या मध्ये म्हटले आहे की, भारतात एखाद्या कंपनीला त्यांचे कार्य चालू ठेवायचे असेल, तर त्यांनी देशाचा अचूक नकाशा वापरला पाहिजे.

मंत्री चंद्रशेखर यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपला उद्देशून असे लिहिले आहे की, "कृपया भारताच्या नकाशातील त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करा, ही विनंती आहे. भारतात व्यवसाय करणार्‍या किंवा भारतात व्यवसाय सुरू ठेवू इच्छिणार्‍या सर्व प्लॅटफॉर्मने योग्य नकाशे वापरणे आवश्यक आहे," त्यांनी पुढे लिहिले.

व्हॉट्सअ‍ॅपने मागितली माफी

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने या चुकीचा नकाशा दिल्याचे ट्विट मागे घेत ट्विटरवर भारतीयांची माफी मागितली आहे. "या त्रुटी निदर्शनास आणून दिल्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार; आम्ही या तक्रारीची दखल घेऊन ही लिंक काढून टाकली आहे. याबाबत दिलगिरी देखील व्यक्त करत आहोत. भविष्यात अशा गोष्टींपासून आम्ही सावध राहू. अशा मजकुराचे व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाने ट्विट केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news