Indian Coast Guard : गुजरात सीमेवर ३०० कोटींचे अमली पदार्थ जप्त; शस्त्रसाठ्यासह १० पाकिस्तानी घुसखोरांना अटक | पुढारी

Indian Coast Guard : गुजरात सीमेवर ३०० कोटींचे अमली पदार्थ जप्त; शस्त्रसाठ्यासह १० पाकिस्तानी घुसखोरांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात एका पाकिस्तानी बोटीवर कारवाई केली. या कारवाईत १० क्रू मेंबर्ससह, शस्त्रास्त्रे आणि ४० किलो अमली पदार्थ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबाबत भारतीय तटरक्षक दलाकडून (Indian Coast Guard) प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या एटीएस पथकाने (ATS) दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे अरबी समुद्रातील भारतीय सीमेवरील अरबी समुद्रात एक पाकिस्तानी बोटीवर कारवाई करण्यात आली.

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, पाकिस्तानला लागून असलेल्या गुजरात येथील अंतरराष्ट्रीय सागरी सिमेवर भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) त्यांचे अरिंजय जहाज तैनात केलेले होते. २५-२६ डिसेंबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाई बाबतची माहिती तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तानच्या मासेमारी करणाऱ्या बोटीची चौकशी

तटरक्षक दलाने अल सोहेली या पाकिस्तानच्या मासेमारी करणाऱ्या बोटीला चौकशी आणि तपासणीसाठी अडवले. बोटीची झडती घेतली असता त्यामधून मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा आणि सुमारे 40 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत अंदाजे ३०० कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईत बोटीसह, यातील उपस्थित सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या १० जणांना आणि बोट ओखा येथे आणण्यात आली.

हेही वाचा

Back to top button