

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shreekrushna Janmabhumi Dispute : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदाच्या वादावर मथुरा न्यायालयाने शाही ईदगाह मशिद संकुलाचे अधिकृत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणावर ज्याप्रमाणे आदेश दिले होते. त्याचा संदर्भ देऊन या प्रकरणात घेण्यात आला आहे.
Shreekrushna Janmabhumi Dispute : याप्रकरणी हिंदू सेनाने दावा केला होता. या दाव्यावर सिविल जज सीनियर डिवीजन (तृतीय) न्यायालयाने हे आदेश दिले आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि उपाध्यक्ष सुरजित सिंह यादव, (रा. दिल्ली) यांनी 8 डिसेंबरला दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग (III) न्यायाधीश सोनिका वर्मा यांच्या न्यायालयात दावा केला होता.
या याचिकेत हिंदू सेनेने दावा केला होता की, श्रीकृष्ण जन्मभूमीचे मंदिर हे 13.37 एकर जागेवर पसरलेले होते. त्यावर औरंगजेबाने आक्रमण करून ते पाडून ईदगाह तयार केले आहे. भगवान श्रीकृष्ण जन्मापासून ते मंदिर उभारणीपर्यंतचा संपूर्ण इतिहास त्यांनी न्यायालयासमोर मांडला.
Shreekrushna Janmabhumi Dispute : वादींचे वकील शैलेश दुबे यांनी 8 डिसेंबर रोजी हे संपूर्ण प्रकरण न्यायालयासमोर ठेवले होते असे म्हटले आहे. न्यायालयाने त्याच दिवशी गुन्हा नोंदवून अधिकृत अहवालाचे आदेश दिले होते. या संदर्भातील सुनावणी 22 डिसेंबर रोजी न्यायालयात होऊ शकली नाही. आता 20 जानेवारीपर्यंत ईदगाहचा अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.
तसेच यावेळी हिंदू सेनेने श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ विरुद्ध शाही मशीद इदगाह यांच्यात १९६८ साली झालेल्या करारालाही त्यांनी आव्हान दिले आहे.
हे ही वाचा :