Cheetah Reintroduction : देशात अजून १४ चित्ते आणणार : केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे | पुढारी

Cheetah Reintroduction : देशात अजून १४ चित्ते आणणार : केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारने २० जुलै २०२२ रोजी ‘वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत जैवविविधता वापर’ या अंतर्गत दक्षिण अफ्रिकेच्या नामिबिया सरकारसोबत करार केला आहे. त्यानुसार भारतातून नष्ट झालेल्या चित्त्यांना भारतात पुन्हा आणणण्यासाठी नामिबियातून 8 चित्त्यांना भारतात आणण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवशी दि. १७ सप्टेंबरला या चित्त्यांना मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. यानंतर अजून १२ ते १४ चित्ते देशात आणले जाणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिली आहे. Cheetah Reintroduction

देशात चित्ते आल्याने लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? : अजित पवारांचा सवाल

केंद्राच्या सध्या सुरू असलेल्या या प्रकल्पांतर्गत २०२१-२२ ते २०२५-२६ वर्षांसाठी ३८.७० कोटी रुपये मंजूर असून त्याशिवाय वनीकरण निधी आणि व्यवस्थापन अंतर्गत २९.४७ कोटी निधीची तरतूद असल्याची माहिती मंत्री चौबे यांनी दिली आहे. हा खर्च नियोजन प्राधिकरण (CAMPA) साठी असून यामध्ये चित्ता परिचय, व्यवस्थापन आणि देखभाल खर्च समाविष्ट आहे. Cheetah Reintroduction

Chittah in India : चित्ते आले पण…

पहिल्या प्रयोगांतर्गत अनेक तज्ज्ञांचे मत होते की दक्षिण आफ्रिकेतील वातावरण आणि जंगले खूप वेगळी असल्याने भारतातील वातावरण चित्यांना इतके अनुकूल नाही. त्यामुळेच सुरुवातीला चित्त्यांसाठी कुनो उद्यानात खास व्यवस्था करण्यात आली होती तसेच त्यांना विलगीकरण करून ठेवण्यात आले होते.. चित्त्यांना भारतात येऊन आता काही महीने उलटले असून अद्याप सर्व चित्ते स्वस्थ आणि निरोगी आहेत. Cheetah Reintroduction

हे वाचलंत का?

Back to top button