तिहारचे तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांचे निलंबन | पुढारी

तिहारचे तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांचे निलंबन

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांचे आज (दि.२२) गृह मंत्रालयाकडून निलंबन करण्यात आले. महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून साडेबारा कोटी घेतल्याचा गंभीर आरोप गोयल यांच्यावर झाला होता. गेल्या महिन्यात खुद्द सुकेशने हा आरोप केला होता.

सुकेशच्या आरोपानंतर गोयल यांची इतरत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता सेवेतून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मंडावली येथील तुरुंगात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण गोयल यांना साडेबारा कोटी रुपये तर दिल्लीच्या आप सरकारमधले मंत्री सत्येंद्र जैन यांना दहा कोटी रुपये दिले होते, असा दावा सुकेशने केला होता. सध्या जैन आणि गोयल यांच्याकडून धमक्या मिळत असल्याचे सुकेशने अलिकडेच एका पत्राद्वारे सांगितले होते.

हेही वाचा : 

Back to top button